राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक महिला भगिनींच्या बँक खात्यामध्ये थकीत हप्त्यांचे ₹ ६,००० (सहा हजार रुपये) जमा करण्यात आले आहेत.
ज्या महिला पात्र असूनही त्यांचे हप्ते थांबले होते, त्यांना जून महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंतचे (४ महिने x ₹ १५००) हप्ते म्हणजेच ₹ ६,००० ची एकत्रित रक्कम मिळाली आहे. मात्र, जर तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नसेल, तर तुम्हाला तात्काळ ‘हे’ काम करणे आवश्यक आहे.
१. ₹ ६,००० कोणास मिळाले? (पात्रता निकष)
ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांचे हप्ते जमा झाले नव्हते, त्यांना ₹ ६,००० मिळाले आहेत. ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ज्या महिला पात्र ठरल्या, त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे.
यामध्ये विनाकारण अपात्र ठरलेल्या महिलांचा समावेश आहे, ज्यांनी ई-केवायसीद्वारे आपली खरी माहिती शासनासमोर सादर केली.
२. महत्त्वाचा नियम: विनाकारण अपात्र ठरलेल्या महिलांसाठी संधी
अनेक महिलांना खालीलपैकी काही कारणांमुळे विनाकारण अपात्र ठरवले गेले होते. त्यांनी ई-केवायसी केल्यास त्यांची पात्रता पुन्हा सिद्ध झाली आणि त्यांचे थकीत हप्ते जमा झाले:
| हप्ता बंद होण्याचे कारण | ई-केवायसी नंतरची स्थिती |
| कुटुंबात चारचाकी वाहने | ज्या कुटुंबात चारचाकी वाहन नसतानाही विनाकारण अपात्र ठरवले, त्या आता पात्र. |
| उत्पन्न ₹ २.५ लाखांपेक्षा जास्त | उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असतानाही जास्त दाखवून अपात्र झालेल्या महिला आता पात्र. |
| बनावट कागदपत्रे | बनावट कागदपत्र म्हणून अपात्र ठरलेल्या, पण कागदपत्रे मूळात खरी असलेल्या महिला पात्र ठरल्या. |
| आयकर भरणारे सदस्य | कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसतानाही अपात्र ठरलेल्या महिला ई-केवायसीनंतर पात्र ठरल्या. |
| कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेणाऱ्या | फक्त दोनच महिला (उदा. एक विवाहित आणि एक अविवाहित) लाभ घेत असतानाही अपात्र ठरल्या असल्यास, ई-केवायसीनंतर त्या पात्र झाल्या आहेत. (दोन विवाहित महिला असल्यास, त्यापैकी एकच पात्र ठरेल.) |
| इतर योजनेतून लाभ (उदा. श्रावण बाळ/संजय गांधी योजना) | इतर निराधाराच्या योजनेतून लाभ मिळत नसतानाही अपात्र ठरलेल्या ‘करेक्ट’ महिला पात्र ठरल्या. |
| वय वर्ष ६५ पेक्षा जास्त | ज्या महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा कमी असूनही विनाकारण जास्त दाखवले गेले होते, त्या ई-केवायसी नंतर पात्र ठरल्या आहेत. |
३. हप्ता मिळाला नसेल तर तातडीने ‘हे’ काम करा!
तुम्ही वरील निकषांनुसार पात्र असाल, पण अजूनही तुमच्या खात्यात ₹ ६,००० जमा झाले नसतील, तर तुम्ही तातडीने ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास, तुम्ही पात्र आहात की नाही, याची खात्री प्रशासनाला होते. त्यानंतर पेंडिंग असलेले सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात.
महत्त्वाची सूचना: ज्या महिला ई-केवायसी नंतर पात्र ठरतील, त्यांनाच इथून पुढे या योजनेचा लाभ मिळत राहील आणि अपात्र महिलांना योजनेतून बाद करण्यात येईल, असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈