20 Year Old Car New Rule: केंद्र सरकारने जुन्या वाहनांच्या मालक-चालकांना मोठा दिलासा दिला आहे. मोटार वाहन कायद्यातील नियमांमध्ये बदल करून, सरकारने जुने वाहन वापरण्याची मर्यादा पाच वर्षांनी वाढवली आहे. आता 15 वर्षांऐवजी 20 वर्षे जुनी वाहने देशभरात चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
20 Year Old Car New Rule
हा नवीन नियम ‘केंद्रीय मोटार वाहन नियम, 2025’ अंतर्गत लागू करण्यात आला आहे.
नियमातील महत्त्वाचे बदल आणि अटी
केंद्र सरकारच्या या निर्णयामागे रस्त्यांवरून जुनी, प्रदूषणकारी वाहने हळूहळू कमी करणे आणि लोकांना नवीन वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे.
- वयोमर्यादा वाढली: जुन्या वाहनांची नोंदणी मर्यादा 15 वर्षांऐवजी 20 वर्षांपर्यंत वाढवता येणार आहे. याचा अर्थ जुने वाहन आता आणखी 5 वर्षे चालवता येईल.
- शुल्क भरणे अनिवार्य: 15 वर्षांनंतर नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी वाहनधारकांना वेगवेगळे आणि अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे.
- लागू क्षेत्र: हा आदेश दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) वगळता संपूर्ण देशभरात लागू केला जाईल.
विविध वाहनांसाठी नवीन नूतनीकरण शुल्क
जुनी वाहने 20 वर्षांपर्यंत चालवण्यासाठी नोंदणी नूतनीकरण करताना (Registration Renewal) वेगवेगळ्या श्रेणीनुसार खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागेल:
| वाहनाचा प्रकार | नूतनीकरण शुल्क (Renewal Fee) | 
| दुचाकी (Motorcycle) | ₹ 2,000 | 
| तीनचाकी/चारचाकी | ₹ 5,000 | 
| हलकी मोटार वाहने (LMV) | ₹ 10,000 | 
| इतर श्रेणीतील वाहने | ₹ 12,000 | 
| आयात केलेली दुचाकी | ₹ 20,000 | 
| आयात केलेली चारचाकी | ₹ 80,000 | 
| अवैध वाहने | ₹ 100 | 
हे नवीन नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून प्रभावी मानले जातील.
 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈
 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈
        		 
		 
                       
                       
                      