8th Pay Commission 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) करणे अत्यंत आवश्यक आहे. केवायसी करण्याची मुदत आता जवळ येत आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
8th Pay Commission 2025
तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच अगदी सोप्या पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्याची संपूर्ण A to Z प्रोसेस खालीलप्रमाणे दिली आहे:
पायरी १: योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा
- सर्वात प्रथम, तुमच्या मोबाईलमध्ये Google उघडा.
- सर्च बारमध्ये फक्त “लाडकी बहीण” असे सर्च करा.
- सर्वात पहिली जी वेबसाईट दिसेल, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” त्यावर क्लिक करा.
- वेबसाईटवर आल्यावर, तुम्हाला एक मोठा बॉक्स दिसेल: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या बॉक्सवर क्लिक करा.
पायरी २: लाभार्थी (बहिणीची) माहिती भरा
- लाभार्थी आधार क्रमांक: या बॉक्समध्ये लाडक्या बहिणीचा आधार नंबर अचूक टाका.
- कॅप्चा (Captcha): स्क्रीनवर दिसणारे आकडे किंवा अक्षरे जशीच्या तशी पुढील बॉक्समध्ये टाका.
- संमती द्या: खालील “मी सहमत आहे” या बटनावर टिक (Tick) करा.
- ओटीपी पाठवा: आता “ओटीपी पाठवा” या बटणावर क्लिक करा.
टीप: कधीकधी ओटीपी येण्यास उशीर होतो किंवा तांत्रिक अडचणी येतात. अशा वेळी तुम्ही सकाळी लवकर (पहाटे) किंवा रात्री ११ नंतर प्रयत्न करू शकता.
पायरी ३: वडिलांचा/पतीचा आधार प्रमाणीकरण (Authentication)
- आधार ओटीपी: तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला सहा अंकी ओटीपी बॉक्समध्ये टाकून ‘सबमिट’ करा.
- वडील/पतीचा आधार: आता तुम्हाला वडील किंवा पतीचा आधार क्रमांक विचारला जाईल.
- वडील किंवा पती (जे कोणी असतील) त्यांचा आधार क्रमांक येथे टाका.
- पुन्हा कॅप्चा टाका आणि “मी सहमत आहे” वर टिक करा.
- “ओटीपी पाठवा” वर क्लिक करा.
- पती/वडिलांचा ओटीपी: वडील किंवा पती यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवर आलेला सहा अंकी ओटीपी बॉक्समध्ये टाकून ‘सबमिट’ करा.
महत्त्वाची नोंद: ज्या महिलांना वडील किंवा पती नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने अद्याप कोणताही वेगळा पर्याय दिलेला नाही. त्यामुळे, असा पर्याय आल्यास तुम्हाला थांबावे लागेल.
पायरी ४: जात प्रवर्ग आणि घोषणा
- जात प्रवर्ग (Category): आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग ( Caste Category) निवडायचा आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या पर्यायांपैकी तुमचा योग्य प्रवर्ग निवडा.
- दोन महत्त्वाचे प्रश्न: तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील.
- पहिला प्रश्न: याचे उत्तर ‘होय’ सिलेक्ट करा.
- दुसरा प्रश्न: याचे उत्तर सुद्धा ‘होय’ सिलेक्ट करा.
- अटी मान्य करा: खालील “उपरोक्त क्रमांक १ व २ मधील अटी मान्य आहेत” या बॉक्सवर टिक करा.
- सबमिट करा: आता “सबमिट करा” वर क्लिक करा.
पायरी ५: पडताळणी स्थिती तपासा
तुम्ही सबमिट करताच, तुमच्या स्क्रीनवर “तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” असा संदेश दिसेल. याचा अर्थ तुमची ई-केवायसी आता पूर्ण झाली आहे!
केवायसी झाली आहे की नाही, कसे तपासावे?
- पुन्हा पहिल्या पायरीनुसार वेबसाईटवर जा आणि क्लिक करा.
- तुमचा लाभार्थी आधार क्रमांक टाका आणि ओटीपी पाठवा.
- तुम्ही “ओटीपी पाठवा” वर क्लिक करताच, तुम्हाला “तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे” असा संदेश दिसेल.
टीप: eKYC करताना तुम्हाला काय अडचण (Error) येत आहे, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतरांनाही त्याबद्दल माहिती मिळेल.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈