लाडकी बहीण योजनेची केवायसी नवीन प्रक्रिया आली! अवघ्या २ मिनिटांत पूर्ण करा अन्यथा नोव्हेंबरचा हप्ता बंद! DA Hike Update 2025

DA Hike Update 2025 : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी आता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुमच्या बँक खात्यात मासिक हप्ता न चुकता जमा होण्यासाठी खाली दिलेल्या नवीन आणि सोप्या पद्धतीने तुमची ई-केवायसी त्वरित पूर्ण करा.(DA Hike Update 2025)

महत्त्वाची नोंद: ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आणि पती/वडिलांचा आधार क्रमांक आवश्यक असेल.

अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पहा किती वाढ लागू झाली! DA Hike Employees
अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पहा किती वाढ लागू झाली! DA Hike Employees

ई-केवायसी करण्याची संपूर्ण सोपी प्रक्रिया (अवघ्या २ मिनिटांत)

तुमच्या मोबाईलमध्ये ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याच्या सोप्या पायऱ्या खालीलप्रमाणे: ( DA Hike Update 2025 )

पायरी १: पोर्टलवर लॉगिन आणि आधार प्रमाणीकरण

  1. वेबसाईटवर जा: Google मध्ये “लाडकी बहिण महाराष्ट्र gov dot in” असे सर्च करून योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा.
  2. e-KYC लिंक: मुखपृष्ठावर, “लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर टच करा.
  3. आधार क्रमांक: लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक अचूक भरा.
  4. ओटीपी पाठवा: कॅप्चा कोड भरून, ‘मी सहमत आहे’ यावर टिक करा आणि नंतर ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा.
  5. OTP सबमिट करा: आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करून ‘Submit’ बटनावर टच करा.

पायरी २: कुटुंबाच्या आधार क्रमांकाची पडताळणी

  1. दुसरा आधार क्रमांक: पुढील पेजवर, लाभार्थी महिला विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक आणि अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक टाका.
  2. ओटीपी पाठवा: कॅप्चा टाकून, ‘मी सहमत आहे’ वर टिक करा आणि पुन्हा ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा.
  3. OTP एंटर करा: ज्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकला आहे, त्यांच्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करा आणि ‘सबमिट करा’ बटनावर टच करा.

टीप: ज्यांच्या कुटुंबात वडील किंवा पती नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने अजून कोणताही पर्याय काढलेला नाही. सरकारने यावर निर्णय घेताच, त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल.

पीएम किसान आणि नमोचा ४,००० चा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार? तुमचं नाव चेक करा Namo Shetkari And PM Kisan Installment
पीएम किसान आणि नमोचा ४,००० चा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार? तुमचं नाव चेक करा Namo Shetkari And PM Kisan Installment

पायरी ३: जात प्रवर्ग निवड आणि महत्त्वाचे घोषणापत्र

  1. जात प्रवर्ग (Cast Category): आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (Category) दिलेल्या यादीतून योग्यरित्या निवडायचा आहे.
  2. दोन महत्त्वाचे घोषणापत्र (Declaration): खालील दोन अत्यंत महत्त्वाचे पर्याय वाचून त्यांना ‘होय’ (Yes) निवडायचे आहे. (इथे चूक करू नका, दोन्ही पर्याय ‘होय’ सिलेक्ट करा)
    • सरकारी नोकरी: “माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम/मंडळ… मध्ये कार्यरत नाहीत…” (निवड: होय)
    • लाभार्थी संख्या: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” (निवड: होय)
  3. अंतिम संमती: खालील टर्म्स आणि कंडिशन वाचून त्यावर टिक मार्क करा.

पायरी ४: प्रक्रिया पूर्ण करा

सर्व माहिती भरून झाल्यावर ‘Submit’ बटनावर क्लिक करा.

तुम्हाला “e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” (e-KYC Successful) असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. ही संपूर्ण प्रक्रिया तांत्रिक अडचणींशिवाय अवघ्या २ ते ५ मिनिटांत पूर्ण होते.

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 2000 रुपये या दिवशी खात्यावर जमा होणार; येथे चेक करा PM Kisan Yojana 21st Installment Date
पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 2000 रुपये या दिवशी खात्यावर जमा होणार; येथे चेक करा PM Kisan Yojana 21st Installment Date

        WhatsApp Icon व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈

Leave a Comment