गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. राज्यात सक्रिय असलेल्या दोन चक्रीवादळांमुळे हे पावसाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, आता हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार, राज्यातून पाऊस लवकरच निरोप घेणार आहे आणि त्यानंतर थंडीची चाहूल सुरू होईल.
Heavy Rain
पावसाची नेमकी विश्रांती कधी असेल? आणि थंडीचे स्वरूप कसे असेल? याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे:
राज्यात पाऊस कधी थांबणार? महत्त्वाच्या तारखा आणि नैसर्गिक संकेत
पंजाब डख यांच्या अभ्यासानुसार, सध्याचा पाऊस अजून काही दिवस सक्रिय राहू शकतो.
- विखुरलेला पाऊस: २८, २९ आणि ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वदूर नसून, तो केवळ स्थानिक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपात असेल.
- पावसाचा जोर कमी होणार: १ नोव्हेंबरनंतर पावसाचा जोर लक्षणीयरीत्या ओसरेल.
- पावसाची पूर्ण माघार: २ नोव्हेंबर पासून राज्यात पावसाची तीव्रता खूप कमी होईल आणि बहुतांश भागातून पाऊस कायमस्वरूपी निरोप घेईल.
नैसर्गिक संकेत: ‘जाळी धुई’चा (कोळ्यांची जाळी आणि दव) अर्थ
पंजाब डख यांनी निसर्गातील एका महत्त्वपूर्ण बदलाकडे लक्ष वेधले आहे, जो पावसाच्या एक्झिटचा स्पष्ट संकेत देतो.
महत्त्वाची टीप: शेतात ‘जाळी धुई’ (कोळ्यांची जाळी आणि दव) पडायला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या या संकेतानुसार, एकदा जाळी धुई पडल्यास, त्यानंतर राज्यातून पाऊस १२ दिवसांनी पूर्णपणे निघून जातो, असे पंजाब डख यांचे निरीक्षण आहे.
२८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान कोणत्या भागात असेल पाऊस?
सध्या पडणारा पाऊस ‘भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा’ असल्याने, खालील विभागांतील काही तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावेल:
- पूर्व आणि पश्चिम विदर्भ
- मराठवाडा
- दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र
- कोकणपट्टी आणि खान्देश
- मुंबई, पुणे, नाशिक यांसारखी प्रमुख शहरे आणि त्यांच्या आसपासचा परिसर
- उत्तर महाराष्ट्रात सुरुवात: २ नोव्हेंबरच्या आसपास उत्तर महाराष्ट्रातील (नाशिक, निफाड, नंदुरबार, जळगाव) भागातून थंडीची सुरुवात होईल.
- राज्यात प्रसार: ही थंडी हळूहळू उत्तरेकडून दक्षिणेकडील जिल्ह्यांकडे पसरेल. सोलापूरसह दक्षिणेकडील भागांमध्ये ४, ५, किंवा ६ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा प्रभाव जाणवू लागेल.
- धुके आणि धुळीचे वातावरण: २ ते ७ नोव्हेंबर या काळात राज्याच्या अनेक भागांत ‘धुई, धुके, धुराळे’ (Fog/Mist) चे ढगाळ आणि थंड वातावरण असेल, जे थंडीच्या आगमनाची सूचना देईल.
 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈
 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈
        		 
		 
                       
                       
                      