लाडकी बहीण योजनेची e-KYC नवीन प्रक्रिया सुरू! अवघ्या २ मिनिटांत पूर्ण करा, अन्यथा पुढील हप्ते बंद Ladki Bahin Yojana New KYC Process

महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा दरमहा मिळणारा ₹१,५०० चा लाभ खंडित होऊ नये यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आता बंधनकारक आहे. अनेक तांत्रिक अडचणींनंतर, आता योजनेचे पोर्टल व्यवस्थित सुरू झाले आहे. लाभार्थी महिला अवघ्या २ ते ५ मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. Ladki Bahin Yojana New KYC Process

ई-केवायसी (e-KYC) करण्याची संपूर्ण सोपी प्रक्रिया (Step-by-Step)

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा आणि तुमच्या पती/वडिलांचा आधार क्रमांक आणि त्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक असेल.

अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पहा किती वाढ लागू झाली! DA Hike Employees
अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पहा किती वाढ लागू झाली! DA Hike Employees

पायरी १: पोर्टलवर लॉगिन आणि आधार प्रमाणीकरण

१. अधिकृत पोर्टलवर जा: Google मध्ये “लाडकी बहिण महाराष्ट्र gov dot in” असे सर्च करून योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा. २. e-KYC लिंक: मुखपृष्ठावर, “लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करा. ३. आधार आणि OTP: लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. ‘मी सहमत आहे’ वर टच करून ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा. ४. OTP सबमिट: आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करून ‘Submit’ करा.

पायरी २: कुटुंबाचा तपशील आणि OTP द्वारे पडताळणी

१. दुसरा आधार क्रमांक: पुढील पेजवर, लाभार्थी महिला विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक आणि अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक टाका. २. OTP द्वारे पडताळणी: कॅप्चा टाकून ‘मी सहमत आहे’ वर टच करा आणि ‘OTP पाठवा’ बटनावर क्लिक करा. त्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP एंटर करून ‘सबमिट करा’ बटनावर टच करा.

पीएम किसान आणि नमोचा ४,००० चा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार? तुमचं नाव चेक करा Namo Shetkari And PM Kisan Installment
पीएम किसान आणि नमोचा ४,००० चा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार? तुमचं नाव चेक करा Namo Shetkari And PM Kisan Installment

पायरी ३: जात प्रवर्ग आणि महत्त्वाचे घोषणापत्र (Declaration)

१. जात प्रवर्ग: आता तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग (Cast Category) योग्य यादीतून निवडायचा आहे. २. महत्वाचे घोषणापत्र (येथे चूक करू नका!) * खालील दोन अत्यंत महत्त्वाचे पर्याय वाचून त्यांना ‘होय’ निवडायचे आहे: * सरकारी नोकरी: “माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत.” (निवड: होय) * लाभार्थी संख्या: “माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.” (निवड: होय) ३. अंतिम संमती: खालील टर्म्स आणि कंडिशन वाचून त्यावर टिक मार्क करा.

पायरी ४: प्रक्रिया पूर्ण करा

१. सर्व माहिती भरून झाल्यावर ‘Submit’ बटनावर क्लिक करा. २. तुम्हाला “e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे” (e-KYC Successful) असा मेसेज स्क्रीनवर दिसेल.

पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 2000 रुपये या दिवशी खात्यावर जमा होणार; येथे चेक करा PM Kisan Yojana 21st Installment Date
पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता 2000 रुपये या दिवशी खात्यावर जमा होणार; येथे चेक करा PM Kisan Yojana 21st Installment Date

तातडीची सूचना!

  • वेळेची नोंद: तांत्रिक अडचणींशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या २ ते ५ मिनिटांत पूर्ण होते.
  • अंतिम मुदत: e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ जाहीर झाली आहे. तुमचा हप्ता नियमितपणे मिळवण्यासाठी त्वरित ई-केवायसी पूर्ण करून घ्या.
  • पैसे बंद: e-KYC न करणाऱ्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही.

        WhatsApp Icon व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈

Leave a Comment