SEBI Recruitment 2025: सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) अर्थातच ‘भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाने’ ‘अधिकारी ग्रेड ए’ (सहाय्यक व्यवस्थापक) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ११० रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
SEBI Recruitment 2025
ही टॉप क्लास अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी असून, निवड झालेल्या उमेदवारांना ₹१,८४,००० पर्यंत (अंदाजित) मासिक वेतन मिळेल.
पदे, रिक्त जागा आणि महत्त्वाच्या तारखा
सेबीमध्ये विविध विभागांमध्ये एकूण ११० जागांसाठी ही भरती होत आहे:
रिक्त जागांचा तपशील (एकूण ११० पदे):
| पदनाम | विभाग | रिक्त जागांची संख्या |
| असिस्टंट मॅनेजर | General | ५६ |
| असिस्टंट मॅनेजर | Legal | २० |
| असिस्टंट मॅनेजर | IT | २२ |
| असिस्टंट मॅनेजर | Research | ०४ |
| असिस्टंट मॅनेजर | Official Language | ०३ |
| असिस्टंट मॅनेजर | Electrical Engineering | ०२ |
| असिस्टंट मॅनेजर | Civil Engineering | ०३ |
महत्वाच्या तारखा:
| तपशील | तारीख |
| ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | ३० ऑक्टोबर २०२५ |
| ऑनलाइन अर्ज करण्याची (आणि शुल्क भरण्याची) शेवटची तारीख | २८ नोव्हेंबर २०२५ |
पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- म्हणजेच, अर्जदाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९५ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.
- सेबीने घालून दिलेल्या नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग, इतर मागास वर्ग (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EWS) श्रेणीसाठी: ₹१,००० (अर्ज शुल्क आणि सूचना शुल्कासह १८% जीएसटी मिळून)
- अनुसूचित जाती (SC)- जमाती (ST) आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बळ उमेदवारांसाठी (PwBD): ₹१०० (सूचना शुल्कासह १८% जीएसटी मिळून)
- टीप: परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
वेतन आणि फायदे (Grade ‘A’ अधिकारी)
ग्रेड ‘ए’ अधिकारी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन मिळेल:
- वेतनश्रेणी (पे स्केल): ₹६२,५००- ३६०० (४)- ७६,९००- ४०५० (७)- १,०५,२५० EB- ४०५० (४)- १,२०,४५०- ४६५० (१)- १,२६,१०० (१७ वर्षांसाठी).
- अंदाजित मासिक वेतन:
- मुंबईत निवासस्थानाशिवाय: अंदाजे ₹१,८४,००० प्रति महिना.
- मुंबईत निवासस्थानासह: अंदाजे ₹१,४३,००० प्रति महिना.
- इतर भत्ते: राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) मध्ये सेबीचे योगदान, ग्रेड अलाउन्स, स्पेशल अलाउन्स, महागाई भत्ता, फॅमिली अलाउन्स, लोकल अलाउन्स, लर्निंग अलाउन्स आणि स्पेशल ग्रेड अलाउन्स यांचा समावेश वेतनात असेल.
- परिविक्षाधीन (Probationary) कालावधी: निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करावा लागेल.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने सेबीच्या अधिकृत लिंकवर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- सेबी भरती ऑनलाईन अर्जप्रक्रियेची लिंक: https://ibpsreg.ibps.in/sebisep25/
- सेबी भरती नोटिफिकेशन पीडीएफ:
टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात (Notification PDF) सविस्तरपणे वाचणे आवश्यक आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈