पुढील ३-४ दिवस ‘या’ जिल्ह्यात आतिमुसळधार पाऊसाचा नुसता कहरचं! जिल्हे यादी पहा Hawaman Andaj

हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र राज्यात पुढील काही तास आणि पुढील ३-४ दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

आज, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील.

अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पहा किती वाढ लागू झाली! DA Hike Employees
अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पहा किती वाढ लागू झाली! DA Hike Employees

जिल्हानिहाय हवामान अंदाज (२७ ऑक्टोबर २०२५)

राज्यातील विविध विभागांसाठी हवामान खात्याने जारी केलेला ‘यलो अलर्ट’ खालीलप्रमाणे आहे:

विभागजिल्हापावसाची तीव्रता
उत्तर महाराष्ट्रनाशिक, जळगावमध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज
उत्तर महाराष्ट्रधुळे, नंदुरबारविजांच्या कडकडासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्रपुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूरविजांच्या कडकडासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
मराठवाडाजालना, संभाजीनगर (छत्रपती संभाजीनगर), बीड, लातूर, नांदेड, धाराशिवहलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
मराठवाडापरभणी, हिंगोलीहलक्या पावसाचा अंदाज
विदर्भबुलढाणा, अकोला, यवतमाळ, गोंदियाहलक्या पावसाची शक्यता
कोकणसंपूर्ण कोकण (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई)हलका ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट

शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • विजांचा धोका: पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी उघड्यावर, झाडांखाली किंवा विजेच्या खांबांखाली उभे राहणे टाळावे.
  • पिकांचे नुकसान: काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
  • प्रवासात काळजी: वादळी वाऱ्यामुळे प्रवास करताना सावधगिरी बाळगावी.

पुढील ३-४ दिवस राज्यात असेच पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. नवीनतम माहितीसाठी स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे.

पीएम किसान आणि नमोचा ४,००० चा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार? तुमचं नाव चेक करा Namo Shetkari And PM Kisan Installment
पीएम किसान आणि नमोचा ४,००० चा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार? तुमचं नाव चेक करा Namo Shetkari And PM Kisan Installment

        WhatsApp Icon व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈

Leave a Comment