Gharkul Yojana List 2025: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची नवीन यादी आता ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरबसल्या सहज पाहू शकता.
Gharkul Yojana List 2025
या यादीमध्ये तुमच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील किती नवीन लाभार्थ्यांची नावे आहेत, त्यांना किती रुपयांचा हप्ता मिळाला आहे आणि किती रक्कम मिळणे बाकी आहे, या सर्व तपशिलांची माहिती तुम्हाला पाहता येईल.
घरकुल योजनेची २०२५-२६ ची नवीन यादी पाहण्याची सोपी प्रक्रिया
घरकुल लाभार्थी यादी तपासण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:
पायरी १: अधिकृत संकेतस्थळ उघडा
- तुमच्या मोबाईलमध्ये Google ओपन करा.
- सर्च बारमध्ये
pmayg.nic.inअसे सर्च करून प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) चे अधिकृत संकेतस्थळ उघडा.
पायरी २: ‘Awaassoft’ रिपोर्ट सेक्शनमध्ये जा
- संकेतस्थळ उघडल्यानंतर, तुमच्या मोबाईलच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन आडव्या रेषांवर (मेनू) क्लिक करा.
- दिसणाऱ्या पर्यायांमध्ये ‘Awaassoft’ हा पर्याय निवडा.
- ‘Awaassoft’ वर क्लिक केल्यानंतर, पुढील उप-पर्यायांमध्ये ‘Report’ (अहवाल) नावाचा विभाग दिसेल, त्यावर क्लिक करा.
पायरी ३: लाभार्थी पडताळणी तपशील (Beneficiary Details) निवडा
- आता एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये विविध अहवालांचे फोल्डर्स असतील.
- या पृष्ठावर खाली स्क्रोल करा. खालून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘Social Audit Report’ या शीर्षकाखालील एकमेव पर्याय “Beneficiary Details for Verification” (लाभार्थी पडताळणी तपशील) यावर क्लिक करा.
पायरी ४: फिल्टर निवडून यादी तपासा
पुढील पानावर तुम्हाला यादी फिल्टर करण्यासाठी खालील माहिती अचूक भरावी लागेल:
| माहिती | निवडायचे आहे |
| राज्य (State) | महाराष्ट्र |
| जिल्हा (District) | तुमचा जिल्हा निवडा. |
| ब्लॉक/तालुका (Block) | तुमचा तालुका निवडा. |
| पंचायत/ग्रामपंचायत (Panchayat) | तुमची ग्रामपंचायत निवडा. |
| आर्थिक वर्ष (Financial Year) | २०२५-२६ हा पर्याय निवडा. |
| योजनेचे नाव (Scheme Name) | तुम्ही अर्ज केलेली योजना निवडा (उदा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण किंवा रमाई आवास योजना). |
पायरी ५: कॅप्चा भरा आणि सबमिट करा
- सर्व माहिती भरल्यानंतर, खालील रकान्यात दिलेले कॅप्चा (बेरीज किंवा वजाबाकीचे उत्तर) योग्यरित्या भरा.
- त्यानंतर ‘Submit’ बटनावर क्लिक करा.
पायरी ६: यादी डाऊनलोड करा
- Submit केल्यावर, तुमच्या ग्रामपंचायतची २०२५-२६ या आर्थिक वर्षाची यादी स्क्रीनवर दिसेल.
- ही यादी तुम्ही “Download PDF” या पर्यायावर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करू शकता आणि मंजूर लाभार्थ्यांची नावे तसेच हप्त्याचे तपशील तपासू शकता.
टीप: ही यादी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची अंतिम यादी असते.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा👈